उमेदवार / विद्यार्थी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांमधील करारनामा :-
परिशिष्ट : १
हा करार उमेदवार / विद्यार्थी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यामध्ये, उमेदवार /विद्यार्थी याने ‘Accept’ या बटणावर क्लिक केल्यामुळे अपोआप अस्तित्वात येईल आणि दोन्ही पक्षांना मान्य कबूल आणि वैध असल्याचे मानण्यात येईल. या करारनाम्यात ‘उमेदवार‘ या संज्ञेचा वापर अशा व्यक्तींसाठी करण्यात येणार आहे की जो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छितो आणि ‘विद्यार्थी’ या संज्ञेचा वापर अशा व्यक्तींसाठी करण्यात आलेला आहे ज्या व्यक्तीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमास विहित पद्धतीचा अवलंब करून प्रवेश घेतला आहे, उमेदवार असे कबूल करतो की,
- उमेदवार / विद्यार्थी ह्याने माहितीपुस्तिका तसेच संगणक पडद्यावर उपलब्ध असलेल्या मजकुराच्या माहितीचे व सूचनांचे व्यवस्थित पद्धतीने वाचन केले आहे आणि त्यानुसार सूचनांचे योग्य रीतीने पालन केले आहे.
- उमेदवार / विद्यार्थी याने खात्री करून घेतलेली आहे की त्याने निवडलेल्या अभ्यासक्रमास तो पात्र आहे आणि जर माहितीपुस्तिका किंवा संगणक पडद्यावर उपलब्ध माहितीप्रमाणे अपात्र ठरत असेल तर त्याचा प्रवेश ताबडतोब रद्द करण्यात येईल आणि त्याने विद्यापीठास भरलेले E-Suvidha शुल्क वगळून इतर शुल्क परतावा विद्यापीठ नियमानुसार देण्यात येईल.
- विद्यार्थ्याने ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश रद्द केला तर शुल्काचा परतावा हा विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेल्या ऑक्टोबर २०१८ राजपत्रानुसार खालीलप्रमाणे असेल.
4.1.3 – If student chooses to withdraw from the programme of study in which he/she is enrolled, the institution concerned shall follow the following five-tier system for the refund of fees [Management (Tuition) Fee] remitted by the student
Sr.No.
|
Percentage of Refund of fees
|
Point of time when notice of withdrawal of admission is received in the HEI
|
1
|
100%
|
15 days or more before formally-notified last date of admission
|
2
|
90%
|
Less than 15 days before the formally- Notified last date of admission
|
3
|
80%
|
15 days or less after the formally- notified last date of admission
|
4
|
50%
|
30 days or less, but more than 15 days, after formally-notified last date of admission
|
5
|
00%
|
More than 30 days after formally-notified last date of admission
|
- विद्यार्थ्यास माहिती आहे की अध्ययन साहित्य (Study Material) त्याने ज्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासकेंद्रावरच मिळेल .तथापि, परीक्षा त्याच अभ्यास केंद्रावर होईल असे नाही. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार इतर अभ्यास केंद्रावरदेखील होऊ शकते. एखाद्या अभ्यास केंद्रामधील विद्यार्थी संख्या कमी असल्यास संमंत्रण सत्र इतर अभ्यास केंद्रावर होईल.
- उमेदवार / विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संदर्भातील कोणतीही तक्रार किंवा इतर कोणतेही निवेदन सादर करावयाचे असल्यास अशी तक्रार किंवा निवेदन विद्यार्थी / उमेदवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत उपलब्ध असलेल्या संगणकीय प्रणालीचा (युजर आय.डीचा) वापर करून करेल अशी तक्रार किंवा निवेदनाने उद्भवणाऱ्या कारणाच्या दिनांकाच्या तीस दिवसांच्या आत संगणकीय प्रणालीचा वापर करूनच करेल.
- उमेदवार / विद्यार्थी यास हे मान्य व कबूल आहे की, विद्यापीठाने अभ्यासक्रम राबविण्याच्या नियमांमध्ये, अध्ययन साहित्यामध्ये पाठ्यक्रमात वेळोवेळी केलेले बदल त्यास बंधनकारक असतील आणि याबाबत त्याची कोणतीही तक्रार असणार नाही.
- उमेदवार / विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या कालावधीमध्ये विद्यापीठात नोंदविलेल्या त्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकात बदल करणार नाही.
- उमेदवारास / विद्यार्थ्यास हे मान्य व कबूल आहे की, त्याने नोंदणीच्या वेळेस विद्यापीठात सादर केलेल्या माहितीत बदल करण्यासाठी (नाव, पत्ता, फोटोग्राफ, भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख इत्यादी) योग्य ते शुल्क आकारण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले आहे.
- उमेदवार / विद्यार्थी यास कल्पना आहे की, त्याच्याकडून कोणतीही असत्य, अपुरी माहिती दिली गेल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल आणि जर त्यास पदवी निर्गमित करण्यात आलेली असेल तर अशाप्रकारे असत्य अपूर्ण माहिती मिळाल्याचे सिद्ध झाल्यावर त्याची पदवी रद्दबातल करण्यात येईल.
- उमेदवार / विद्यार्थी विद्यापीठाचे संकेतस्थळ http//:www.unipune.ac.in/sol येथे नियमितपणे भेट देईल आणि तिथे देण्यात आलेल्या शैक्षणिक किंवा प्रशासकीय स्वरूपाच्या सूचनांचे (उदा परीक्षा हॉल तिकीट डाऊनलोड करणे आणि त्याची छपाई करणे) काटेकोरपणे पालन करील.
- उमेदवार / विद्यार्थी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास अपेक्षित असलेले परिश्रम, शिस्त व प्रामाणिकपणाणे करेल तसेच आपले वर्तन विद्यापीठाच्या सुयोग्य विद्यार्थ्यांप्रमाणे करेल आणि अशी कोणतीही कृती करणार नाही कि जी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यास शोभणार नाही.
- उमेदवारास / विद्यार्थ्यास हे मान्य व कबूल आहे की, मूळ स्थानांतर प्रमाणपत्र (Original Transfer/Leaving Certificate) / मूळ स्थलांतर प्रमाणपत्र (Original Migration Certificate) ची प्रत अभ्यास केंद्रावर जमा करावयाची आहे. दुय्यम स्थानांतर प्रमाणपत्र (Duplicate Transfer/Leaving Certificate) सादर करून प्रवेश घेतला असेल व विद्यार्थी दुसऱ्याही अभ्यासक्रमात प्रवेशित असेल तर याबाबत कायदेशीर बाब उद् भवल्यास त्याची सर्व जबाबदारी उमेदवार / विद्यार्थ्याची असेल. विहित मुदतीत स्थलांतर/स्थानांतर प्रमाणपत्र जमा न केल्यास प्रवेश रद्द करण्यात येतील.
I authorize University to send text messages to my cell phone from time to time to convey academic and administrative information.
I have no objection if details and updates about various career options or job opportunities are sent to my mobile number of email ID. If the student fails to submit Transfer / Migration certificate within prescribed time limit, the admission shall stand cancelled.